मराठी कोंबडीचं हुशार पिल्लू

From Karnataka Open Educational Resources
Jump to navigation Jump to search

परिचय

कोंबडीचे हुशार पिल्लू या कथेत हुशार पिल्लाने कोल्ह्याला शिकवलेली अक्कल.

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • पक्षांची चित्रे दाखवून नावे विचारण्याची कृती घेणे.
  • वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजाची मिमिक्री करून पक्षांची नावे ओळखण्याची कृती घेणे.
  • कोंबडीचे गाणे

गेली माझी कोंबडी गेली माझी कोंबडी

एक होती तांबडी एक होती पांढरी

अशा प्रकारची वेगवेगळी अभिनय गीते घेऊ शकता.

ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया

  • हुशार पिल्लू भोपळ्यात लपले यानंतर पुढील कृती घेणे वर्गातील शैक्षणिक वस्तू लपवून शोधण्याचा खेळ घेणे.
  • लपाछपीचा खेळ दोन गटांमध्ये घेणे
  • व पोलिसांनी चोराला शोधणे हा खेळ घेणे.
  • वर्गात दोन गट करून सांगितलेला . लपून बसलेला शब्द पटकन कोण शोधणार ?ही कृती फ्लॅश कार्ड वापरून घेणे.

श्रवणोत्तर क्रिया

  • कथेच्या शेवटी वर्गातील विद्यार्थ्यांना हुशार पिल्लू प्रमाणे  आपल्या जीवनात घडलेल्या घटना थोडक्यात सांगण्याची कृती घेणे
  • पक्षांचे मुखवटे तयार करून नक्कल करण्याची कृती घेणे.
  • अशा प्रकारच्या कथा घेणे .
  • उदाहरणार्थ हुशार मांजर ,हुशार माकड, हुशार खारुताई ,हुशार दादा.

पाठ्यपुस्तकाशी सलग्नता

Class 6 Marathi साहशी शिरीष

अतिरिक्त संसाधने