मराठी भंगारवाला

From Karnataka Open Educational Resources
Jump to navigation Jump to search

परिचय

ज्ञान म्हणजे भगवान. ज्ञानाची साठवण पुस्तकात असते पुस्तक हे कपाटात, ग्रंथालयात, देणगीदाखल, किंवा भंगारातदेखील मिळाले तरी त्यातील ज्ञान कमी झालेले नसते . पुस्तक वाचणाऱ्याला वाचनाची गोडी लागली तर त्याला कशाचीच आठवण रहात नाही. प्रस्तूत कथेत भंगारात मिळालेले पुस्तक देखील वाचनाची आवड निर्माण करते हे सांगीतलेले आहे.

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • टाकाऊ वस्तूनी भरलेल्या पोत्यात असलेल्या वस्तूंचा अंदाज करून नावे सांगण्यास लावणे.
  • घरातील उपयोगी व टाकाऊ वस्तूंची यादी सांगणे.
  • विविध व्यावसायिकांची चित्रे दाखवून नांवे ओळखण्यास सांगणे.

ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया

  • भंगारवाला, शिक्षिका, विद्यार्थी, भंगार विकणारी बाई अशी एकांकिका सादर करणे .
  • कथेवर आधारीत मध्यांतरावर प्रश्न विचारणे उदा . पुस्तक कोठे मिळाले ? इ.
  • पूर्वतयारीतील भंगार पोत्यातून वस्तू काढत शेवटी विविध पुस्तके काढून नावे वाचणे .

श्रवणोत्तर क्रिया

  • विविध पुस्तकांची ओळख करून देणे .
  • पुस्तकाचे विद्यार्थ्यांकडून वाचन व श्रवण करून घेणे.
  • ग्रंथालयाला भेट देणे.

पाठ्यपुस्तकाशी सलग्नता

उचप्राथमिक इयत्तांसाठी

अतिरिक्त संसाधने