मराठी ऐमनचे दप्तर
Jump to navigation
Jump to search
परिचय
या गोष्टीत मुलांना दप्तराविषयी माहिती देणे. मुले दप्तराचा उपयोग कसा करतात. सकाळी ती दप्तर अगदी प्रेमाने भरतात. पण नंतर संध्याकाळी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. याचे वर्णन दप्तराने आपल्या शब्दात केले आहे. हे दप्तरचे आत्मवृत आहे.
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- अभिनययुक्त गाणे घेणे. "पाटी नं पेन्सिल घेऊ द्या कि रं , मला बी शाळेला येऊ द्या कि रं"
- प्रश्न विचारणे 1)शाळेत जाताना तुम्ही बरोबर काय काय घेऊन जाता ? 2)या सर्व वस्तू तुम्ही कशामध्ये ठेवता ?
- वेगवेगळी चित्रे , वस्तू दाखवून त्या ओळखण्यास लावणे.
ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप
- 1) ऐमण ही कोण होती ? 2) दप्तरला केव्हा मनातून आनंद होत असे ?
- ऐमणचा कोणावर खूप जीव होता?
- ऐमण दप्तरात कोणकोणत्या वस्तू ठेवत असे?
श्रवणोत्तर क्रियाकलाप
- दप्तराची काळजी कशी घ्यावयाची यावर विद्यार्थ्यांची मते मिळविणे
- "खुर्चीचे आत्मवृत्त " या विषयावर मुलांना त्यांचे मनोगत मांडण्यास सांगणे.
- दप्तर नसेल तर काय होईल? यावर दोन गटात चर्चा करायला लावणे.
पाठ्यपुस्तकाशी जोडणे
ही गोष्ट " पुस्तकाचे आत्मवृत" या पाठाशी संबंधित आहे.