मराठी कचऱ्याचा ढीग
Jump to navigation
Jump to search
परिचय
चिकूच्या डोक्यावरचा कचऱ्याचा ढग कसा नाहीसा होतो ? ते या कथेतून स्पष्ट होते. तसेच परिसराची स्वच्छता व आरोग्याचे महत्त्व मुलांना समजावून सांगता येते.
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- TPR कृती : 1) विद्यार्थ्यांना डोळे बंद करून कथा ऐकण्यास सांगणे व कथेतील विविध दृश्य,कृती शिक्षकांनी कथन केल्याप्रमाणे तयार करण्यास सांगणे.
- कथेशी संबंधित चित्र विद्यार्थ्यांना दाखवून प्रश्न विचारणे.1) या चित्रांमध्ये तुम्हाला काय दिसत आहे? 2) हे चित्रे पाहून तुम्हाला काय जाणवते ? ( चित्रे कशी वाटतात?)
- कथेशी संबंधित काही मूलभूत शब्दसंग्रह सादर करणे/अर्थ विचारून घेणे.
ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप
- कथा कितपत समजली आहे हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना झालेल्या भागावर काही प्रश्न विचारणे.1) चिकूच्या डोक्यावर सतत काय असायचे? 2) माशा कशाच्या भोवती फिरायच्या? 3) चिकूच्या मैत्रिणी तिच्याशी कसे वागायच्या? 4) आई चिकूला नेहमी काय सांगायची? 5) चिकू उदास का झाली? इ.
- झालेल्या भागावर आधारित चित्रे दाखवून एक दोन वाक्ये कथा सांगण्यास प्रोत्साहन देणे.
श्रवणोत्तर क्रियाकलाप
- विद्यार्थ्यांना टाकाऊ वस्तुंपासून एखादी उपयोगी वस्तू बनविण्यास सांगणे.
- विद्यार्थ्यांचे गट करून रिकाम्या वेळेमध्ये त्यांच्या आजूबाजूचा परिसर,रस्ते,बाग येथील स्वच्छता करण्यास सांगणे.
- कथेवर आधारित विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणे.1) केळ्याचे साल रस्त्यावर कोणी टाकले? 2) प्लास्टिक पिशव्या कोणी फेकल्या? 3) चिकूचे गाव कसे स्वच्छ व्हायला लागले? 4) कथेच्या शेवटी चिकूच्या बाबतीत काय घडले? इ.
पाठ्यपुस्तकाशी जोडणे
इयत्ता : 2 री ते 8 वी विषय : परिसर व मराठी