मराठी बुटातला दगड
From Karnataka Open Educational Resources
परिचय
प्रस्तावना - एका मुलाला आपल्या बोटामध्ये आलेला दगड हा कोठून आला? हे जाणून घेण्यासाठी त्याने स्वतःला काही प्रश्न विचारतो आणि त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शेवटी त्या बुटातून निघालेला पीस पाहून त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळालं ते बुटातील दगड या कथेचा विषय आहे.
थीम - (संकल्पना)- प्रत्यक्ष जाणून घ्यायच्या अगोदर गैरसमज करून घेणे.
वर्ग- इयत्ता 4 थी.5वी
शिकण्याचे उद्देश:
1) विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणे.
2) विद्यार्थ्यांचे श्रवण कौशल्य वाढविणे.
3) एखाद्या गोष्टीबद्दल सत्या सत्यता पडताळून पाहून निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे.
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- तू बूट वापरतोस का?
- तू बूट कोठे कोठे वापरताना पाहिलास?
- तुला बूट कोणी दिले?
ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप
- बुटातील दगड या गोष्टीमध्ये येणारे नवीन शब्द ओळखून त्यांची यादी कर.
- या कथेमध्ये भुकेलेला कोण आहे?
- शेवटी मुलाच्या बुटतून काय बाहेर निघाले?
श्रवणोत्तर क्रियाकलाप
- वेगवेगळ्या प्राणी आणि पक्षांच्या आवाजाची नक्कल कर आणि तुझ्या वर्ग मित्रांना ती ऐकव.
- वेगवेगळ्या पक्ष्यांच्या पिसांचा संग्रह कर.
- या कथेत बुटतील दगड हा कोठून कोठून आला असेल असे मुलगा विचार करतो ? तुझ्या शब्दात याचे उत्तर लिही.
पाठ्यपुस्तकाशी जोडणे
Class- 4- मराठी - अडाणी खेडूत