मराठी घोटाळा
From Karnataka Open Educational Resources
Revision as of 16:10, 6 December 2024 by Arjun (talk | contribs) (added Category:Marathi using HotCat)
परिचय
घोटाळा
अनअपेक्षित घडलेल्या क्रियेमुळे होणारे अचानक बदल
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- वेगवेगळ्या किटकांचे आवाज विद्यार्थ्यांना ऐकवून कीटकांची नावे सांगण्याची कृती घेणे.
- विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांचा अभिनय करणे व उर्वरित विद्यार्थ्यांनी प्राण्यांचा अभिनय ओळखणे.
- प्रश्न विचारणे तुम्हाला उपद्रव देणाऱ्या कीटकांची नावे लिहा तुम्ही व तुमच्या घरच्या व्यक्ती कोण कोणती कामे करतात कामांची यादी कर
ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप
- घटनाक्रम सांगणारे गाणे कोल्हापूरचा म्हातारा सहलीला गेला. कोल्हापूरचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको सहलीला गेले. कोल्हापूरचा म्हातारा ,म्हातार्याची बायको, बायकोचा मुलगा सहलीला गेले............
- घोटाळा सारख्या अनपेक्षित घडलेल्या घटनांची यादी कर.
- घरी पाळलेले पाळीव प्राणी व घरच्या व्यक्ती यांच्या हातून कधी नकळत घडलेल्या अनपेक्षित घटना सांग.
श्रवणोत्तर क्रियाकलाप
- कुटुंबातील व्यक्तींचे अभिनय करून दाखवणे.
- घोटाळा ही कथा अभिनयुक्त सादर करणे.
- ही कथा किंवा या प्रकारची कथा तुझ्या शब्दात सांग. या कथेतून विद्यार्थ्यांना घडलेल्या घटना क्रमाने लावण्याचे उद्दिष्ट साध्य करता येते.
पाठ्यपुस्तकाशी जोडणे
Class 5th Marathi तेनाली रामाचे चातुर्य
Class 7th Marathi जावयाची करामत