मराठी सिंहाची अंबारी

From Karnataka Open Educational Resources
Revision as of 16:14, 6 December 2024 by Arjun (talk | contribs) (added Category:Marathi using HotCat)

परिचय

पार्श्वभूमी:

जंगलाचा राजा सिंह राज्याचा राजा बनण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा काय होते माहीत आहे का? एक मजेशीर आणि रंगतदार दरबार! ही गोष्ट ऐकल्यावर सगळा प्रकार कळून येईल.

उद्देशे:

या गोष्टीत येणाऱ्या नवीन शब्दांची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे. दुसऱ्यांचे अनुकरण करण्याऐवजी स्वतःचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व महत्त्वाचे आहे, हे मुलांना समजावून सांगणे.

कथाविषय:

विनोद, बुद्धिमत्ता आणि चातुर्य, स्वार्थ.

महत्त्वाची नोंद:

प्राथमिक स्तर, इयत्ता १, २, ३, ४, ५.

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • सर्व विद्यार्थ्यांना कृतींमध्ये सहभागी होण्यास सक्षम बनविण्यासाठी काही गोष्टींचा विचार करता येईल. * इतरांचे अनावश्यक अनुकरण केल्याने होणाऱ्या   धोक्यासंबंधी चर्चा करता येईल. * प्राणी आणि त्यांचे गुणधर्म यावर चर्चा करता येईल. * पूर्वीच्या काळातील राज्यांचे विलासी जीवन आणि   त्याच्या अधिकाराबाबत विद्यार्थ्यांच्या कल्पना वर चर्चा   करता येईल.
  • चित्र दाखवून अंबारी ओळखण्यास सांगा. * अंबारी तुम्ही कुठे पाहिली आहे? * अंबारी कोण वाहतात? * अंबारी वर कोण बसतात? * ही अंबारी कोण बनविली असेल? * आजूबाजूला दिसणाऱ्या विविध व्यवसायांची यादी तयार करा.
  • अभिनयाद्वारे प्राणी ओळखणे.

ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप

  • श्रवण करताना मध्यंतरी काही प्रश्न विचारावे. * शहराचा राजा कोठे बसला होता? * अंबारीत बसण्याची इच्छा कोणाला झाली? * हंबरत बसण्याचा सल्ला सिंहाला कोणी दिला? * अंबारी खाली का पडली * शेवटी सिंहाला काय वाटले?
  • * अंबारीत बसण्याचा सल्ला सिंहाला कोणी दिला? * अंबारी खाली का पडली?
  • * हत्तीवरील अंबारीतून खाली कोण पडला? * शेवटी सिंहाने काय ठरविले?.

श्रवणोत्तर क्रियाकलाप

  • * अंबारीचे चित्र तयार करणे.

* एकता नाटक उखाणे कथेचे सादरीकरण करा.

  • * अंबारीची सफर कशी असेल याची कल्पना करून लिहा. * दुसऱ्या ंच्या कृतीचे अनुकरण करणे योग्य आहे का?
  • * अंबारी पडली नसती तर सिंहाला काय वाटले असते ते लिहा.

पाठ्यपुस्तकाशी जोडणे

शिक्षकांनी या गोष्टीचा पाठ्यपुस्तकातील कोणत्पा पाठाची सहसंबंध आहे.  त्पा पाठाचे अध्यापन करताना या कृतीचे आयोजन करावे.

अतिरिक्त संसाधने