मराठी शानू काय खाणार
From Karnataka Open Educational Resources
Revision as of 22:01, 20 December 2024 by Prabha DSERT (talk | contribs) (→कथा ऐकताना केलेल्या क्रिया)
परिचय
शानू दररोज जेवण करताना आडेवेढे घेत असते.आजूबाजूच्या प्राणी पक्ष्याची माहित देत तिचे बाबा तिला जेऊ घालत असतात
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार खाऊ विचारून घ्यावा.
- विद्यार्थ्यांच्या आवडीच्या रंगानुसार भाज्यांची फळांची नावे विचारून घ्यावी.
- शिक्षक आहार पदार्थावरून छान छान कृतीयुक्त गाणे घेऊ शकतात.
कथा ऐकतानाच्या क्रिया
- एखाद्या विद्यार्थ्याला कथेमधील पक्षी प्राण्यांचा आवाज काढायला सांगावे.
- शिक्षकाने विद्यार्थ्यांना गोष्टीतील शानूला रडण्याचे थांबवण्यासाठी जसे प्रयत्न केले त्या पद्धतीने समजूत घालण्यासाठी हावभाव सहित गाणे गावे.
- गोष्टी मधील शानूची जशी रडते त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना देखील रडण्याची कृती करण्यासाठी संधी देण्यात यावी
श्रवणोत्तर क्रिया
- विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे पक्षाचे प्राण्याचे चित्र रेखाटन करण्याची संधी द्यावी
- चार्ट अथवा फ्लॅश कार्डचा वापर करून प्राणी पक्ष्यांचे आहार पदार्थ जोड्या जुळवण्यास सांगावे.
- गोड आंबट कडू अशा पदार्थांची विद्यार्थ्यांना यादी करण्यास सांगून त्याप्रमाणे कृतीयुक्त खेळ घेण्यात यावेत.
पाठ्यपुस्तकाशी सलग्नता
या ऑडिओ क्लिप द्वारे घेण्यात आलेली गोष्ट इयत्ता तिसरी आणि चौथी च्या क्लासच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.