मराठी भीतीदायक मिठाईवाला
Revision as of 16:04, 6 December 2024 by Arjun (talk | contribs) (added Category:Marathi using HotCat)
परिचय
समर व निव्या जुळी भावंडे होती आणि ते मिठाईवाल्याला खूप घाबरत होते, कारण मिठाईवाला खूपच भीतीदायक होता. पुढे काही अशा घटना घडल्या की त्या मुलांची भीती कमी झाली. कारण तो मिठाईवाला खूपच चांगल्या स्वभावाचा आणि प्रेमळ होता.
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- विद्यार्थ्यांचे गट करून गोष्टीशी संबंधित म्हणजेच विविध चवींची माहिती व्हावी यासाठी एक कृती घेणे.
विविध चवींचे पदार्थ चाखून ओळखायला लावणे.
- तुम्हाला माहित असणाऱ्या मिठाईंची नावे सांगा.
- तुम्हाला आवडणारी मिठाई कोणती?
ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप
- समर आणि निव्या यांचे एकमेकांशी कोणते नाते आहे?
- मिठाईवाला दिसायला कसा होता? मिठाईवाल्याच्या दुकानाचे नाव काय होते?
- मुलांनी मिठाईवाल्याच्या दुकानात काय नवीन आलेले पाहिले?
श्रवणोत्तर क्रियाकलाप
- या गोष्टीत आलेले नवीन शब्द सांगा. तुम्हाला आलेला एखादा भीतीदायक अनुभव सांगा.
- दिवाळीमध्ये तुमच्या घरी कोणकोणते गोड पदार्थ बनतात?
- या गोष्टीला तुम्ही कोणते नवीन शीर्षक देऊ शकाल?