मराठी भंगारवाला
Revision as of 07:41, 26 December 2024 by Prabha DSERT (talk | contribs)
परिचय
ज्ञान म्हणजे भगवान. ज्ञानाची साठवण पुस्तकात असते पुस्तक हे कपाटात, ग्रंथालयात, देणगीदाखल, किंवा भंगारातदेखील मिळाले तरी त्यातील ज्ञान कमी झालेले नसते . पुस्तक वाचणाऱ्याला वाचनाची गोडी लागली तर त्याला कशाचीच आठवण रहात नाही. प्रस्तूत कथेत भंगारात मिळालेले पुस्तक देखील वाचनाची आवड निर्माण करते हे सांगीतलेले आहे.
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- टाकाऊ वस्तूनी भरलेल्या पोत्यात असलेल्या वस्तूंचा अंदाज करून नावे सांगण्यास लावणे.
- घरातील उपयोगी व टाकाऊ वस्तूंची यादी सांगणे.
- विविध व्यावसायिकांची चित्रे दाखवून नांवे ओळखण्यास सांगणे.
ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया
- भंगारवाला, शिक्षिका, विद्यार्थी, भंगार विकणारी बाई अशी एकांकिका सादर करणे .
- कथेवर आधारीत मध्यांतरावर प्रश्न विचारणे उदा . पुस्तक कोठे मिळाले ? इ.
- पूर्वतयारीतील भंगार पोत्यातून वस्तू काढत शेवटी विविध पुस्तके काढून नावे वाचणे .
श्रवणोत्तर क्रिया
- विविध पुस्तकांची ओळख करून देणे .
- पुस्तकाचे विद्यार्थ्यांकडून वाचन व श्रवण करून घेणे.
- ग्रंथालयाला भेट देणे.
पाठ्यपुस्तकाशी सलग्नता
उचप्राथमिक इयत्तांसाठी