मराठी अबब... सगळ्यांसाठी किती आंबे!
परिचय
आपण आपल्या जीवनात अनेक प्रकारची फळे पाहिली आहेत. त्याचप्रकारे शालेय जीवनात मुलांना निसर्गाची आवड निर्माण होण्यासाठी आपण शाळेत अनेक प्रकारची फुलझाडे व फळझाडे व शोभेची झाड सुद्धा लावतो. प्रस्तुत कथेमध्ये आंब्याच्या रोपांची लागवड केलेली आहे, व ती मोठी झाल्यावर सर्व मुले त्या झाडाला लागलेले आंबे मोजून खातात. हे करत असताना मुले गणितातील बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रियांचा वापर करतात. यामुळे मुलांच्या मनात गणितातील क्रियांचा चांगल्या पद्धतीने प्रभाव पाडता येतो.
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- वेगवेगळ्या झाडांची चित्रे दाखवणे
- तुम्हाला माहित असलेल्या फळांची नावे सांगा?
- तुम्हाला कोणती फळे खायला आवडतात?
- जंगलात मिळणारी फळे कोणती?
- फळांचा राजा कोण?
ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया
- आंब्याचे रोपटे कोणी लावले होते?
- प्रत्येक झाडाला किती आंबे लागले होते?
- झाडाला एकूण किती आंबे लागले होते?
- आंब्याची चव कशी होती?
श्रवणोत्तर क्रिया
- आंब्याचे चित्र काढा?
- आंब्याचा उपयोग करून कोणकोणते पदार्थ बनवले जातात?
- आंब्याचे वेगवेगळे प्रकार सांगा.
पाठ्यपुस्तकाशी सलग्नता
प्राथमिक वर्गांसाठी