मराठी हत्ती लागले नाचायला
परिचय
कठीण प्रसंगात जर आपण संयम ठेवून त्यावर मात केली तर त्यातून नक्कीच मार्ग सापडतो.
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- विद्यार्थ्यांची दोन गटात विभागणी करणे आणि एका गटाला पाळीव प्राणी व दुसऱ्या गटाला जंगली प्राणी यांची यादी करण्यास सांगणे.
- मोबाईलच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना काही प्राण्यांचे आवाज ऐकविणे व ते ओळखण्यास सांगणे.
- कोडी विचारणे.
1. असा कोण आहे ज्याला मारताना लोकांना खूप मजा येते.
2. असा कोण आहे जो सगळी कामे हाताऐवजी नाकाने करतो.
ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया
- बडबड गीत हत्ती दादा, हत्ती दादा, सुपाएवढे कान, तुझी भक्कमशी मान , हत्ती दादा हत्ती दादा, खांबाएवढे पाय , मोठे मोठे अंग तुझे डुलत डुलत जाय
- गोष्टीवर आधारित काही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारावे.
1.गोष्टीतील मुलाचे नाव काय?
2.त्याला कशाची आवड होती?
3.जंगलातून जाताना त्याला कोणते प्राणी दिसले?
4. त्याने कोणती युक्ती लढवली?
5.तुम्हाला हत्तीचा आवाज काढता येतो का?
श्रवणोत्तर क्रिया
- त्या त्या इयत्तेनुसार त्यांना अध्ययन नंतरच्या कृती घेणे. विद्यार्थ्यांकडून कार्डशिटच्या सहाय्याने हत्तीचा मुखवटा करून घेणे.
- गोष्टीचा सारांश लिहिण्यासाठी सांगणे. गोष्ट नाटक स्वरूपात सादर करून घेणे.
- दादा हत्ती दादा चाललात कुठे? हे...दादा हत्ती दादा दादा चाललात कुठे? डुलवित मान हलवित कान चाललात कुठे? सुपासारखे कान छान छान छान ... अरे सुपासारखे कान छान छान छान , मानेवरती बसली दोन बदके छान छान छान !! धृ!! हत्ती.... ए.......हत्ती.. भिंती एवढी पाठ तुझी भली मोठी सोंड अरे...भिंती एवढी पाठ तुझी भली मोठी सोंड सोंडेला लटकले तुझ्या माकड दोन दोनदोन !! 1 !! हत्ती.... ए.......हत्ती.. मग हत्ती म्हणतो... तळ्यावरती चाललो मी डुलवीत माझी मान केळी खातो पाणी पितो झोपी जातो छान !! 2 !!
पाठ्यपुस्तकाशी सलग्नता
THE ELEPHANT - V