मराठी आज निमा काय खाते आहे
Revision as of 15:15, 12 January 2025 by Prabha DSERT (talk | contribs)
परिचय
आपणाला विविध ऋतूमध्ये मिळणाऱ्या फळांची माहिती या गोष्टीतून मिळते. फळांना मजेशीर अशी विशेषणे जोडलेली आहेत ज्यामुळे गोष्ट खूप रंंगतदार वाटते.
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- कृती- 1. विविध फळांची चित्रे किंवा फळे दाखवून ती ओळखण्यास सांगणे. 2. माझे नांव काय? (आपली जोडी शोधा) * फळांची नांवे आणि फळे यांची फ्लॅश कार्ड्स तयार करणे. * विद्यार्थ्यांना वर्तुळाकार उभे करून प्रत्येकाला एक फ्लॅश कार्ड् देणे. *यानंतर फळांची नांवे आणि फळे यांच्या फ्लॅश कार्डच्या जोड्या लावणे. 3. ऋतूंच्या नावावर आधारित एखादा उपक्रम घेणे.
- तुमच्या आवडत्या फळाचे चित्र काढा. त्या फळाबद्दल थोडक्यात माहिती सांगा.
- काही प्रश्न 1. सध्या कोणता ऋतू चालू आहे? 2. एकूण किती ऋतू आहेत? 3. ते कोणकोणते? 4. आपण सर्व ऋतूंमध्ये सारखाच आहार खातो काय? 5. तोंडाला पाणी केंव्हा केव्हा सुटते?
ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया
- खाताना कोणकोणते आवाज होतात?
- हिरव्या आंब्याना काय म्हणतात?
- उन्हाळ्यात कोणकोणती फळे मिळतात?
- पावसाळ्यात काय काय खातात?
- जीभ कशाने निळी झाली?
श्रवणोत्तर क्रिया
- हिवाळ्यात काय काय खातात?
- उन्हाळ्यात मिळणारी फळे कोणकोणती?
- पावसाळ्यात काय खायला आवडते?
- हिवाळ्यात मिळणारी फळे कोणकोणती?
- गोष्टीमध्ये आलेली फळे कोणकोणती?
- त्या फळांची चित्रे काढा.
- खालील फळांना कोणती विशेषणे वापरली आहेत?
- कलिंगड, आंबा, बीट रूट, लिची, खरबूज, मलबेरी
- हिवाळा दिवस मोठा असतो की लहान?
- तुम्हाला माहीत असलेल्या पालेभाज्या कोणकोणत्या?
- चिंचांचा रंग कोणता असतो?
- मिटक्या मारून खाणे म्हणजे काय?
- शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काही पदार्थांच्या चवी किंवा काही पदार्थ आपण खाल्ल्यावर काय प्रतिक्रिया येतात. यावर चर्चा करावी. शक्य झाल्यास वेगवेगळ्या चवीचे पदार्थ विद्यार्थ्यांना आणायला सांगून प्रत्यक्षात ही कृती करून घेता येईल.
पाठ्यपुस्तकाशी सलग्नता
इयत्ता पहिली ते चौथी परिसर अध्ययन, ऋतूं आणि आहार, या विषयावर आधारित पाठासाठी.
इयत्ता - 1 ली ओळखा पाहू
इयत्ता - 5 वी मनूला पडलेले स्वप्न