मराठी सिंहाची अंबारी
परिचय
पार्श्वभूमी:
जंगलाचा राजा सिंह ,राज्याचा राजा बनण्याचा प्रयत्न करतो,तेव्हा काय होते ते पाहूया, एक मजेशीर आणि रंगतदार कथा .
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- सर्व विद्यार्थ्यांना कृतींमध्ये सहभागी होण्यास सक्षम बनविण्यासाठी काही गोष्टींचा विचार करता येईल. * इतरांचे अनावश्यक अनुकरण केल्याने होणाऱ्या धोक्यासंबंधी चर्चा करता येईल. * प्राणी आणि त्यांचे गुणधर्म यावर चर्चा करता येईल. * पूर्वीच्या काळातील राजांचे जीवन आणि त्याच्या अधिकाराबाबत विद्यार्थ्यांच्या कल्पना या वर चर्चा करता येईल.
- चित्र दाखवून अंबारी ओळखण्यास सांगा. * अंबारी तुम्ही कुठे पाहिली आहे का? * अंबारी कोण वाहतात? * अंबारी वर कोण बसतात? * ही अंबारी कोणी बनविली असेल? * आजूबाजूला दिसणाऱ्या विविध व्यवसायांची यादी तयार करा.
- अभिनयाद्वारे प्राणी ओळखणे.
ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया
- श्रवण करताना मध्यंतरी काही प्रश्न विचारावे. * शहराचा राजा कोठे बसला होता? * अंबारीत बसण्याची इच्छा कोणाला झाली? दिला?
- * अंबारीत बसण्याचा सल्ला सिंहाला कोणी दिला? * अंबारी खाली का पडली?
- * हत्तीवरील अंबारीतून खाली कोण पडल? * शेवटी सिंहाने काय ठरविले?.
श्रवणोत्तर क्रिया
- * अंबारीचे चित्र तयार करणे.
* कथेचे नाटक रुपात सादरीकरण करणे
- * अंबारीची सफर कशी असेल याची कल्पना करून लिहा. * दुसऱ्याच्या कृतीचे अनुकरण करणे योग्य आहे का?
- * अंबारी पडली नसती तर सिंहाला काय वाटले असते ते लिहा.
पाठ्यपुस्तकाशी सलग्नता
या गोष्टीचा १ ते ५ च्या पाठ्यपुस्तकातील पाठाची सहसंबंध आहे.