मराठी अम्मू आणि कुत्र्याचं पिल्लू
Jump to navigation
Jump to search
परिचय
अम्मू आपल्याकडे कुत्र्याचे पिल्लू आहे असे खोटेच सांगते. त्यामुळे तिला वेळोवेळी खोटे बोलावे लागते.
तिचे मित्र पिल्लू पहायला येणार हे समजल्यावर अम्मू नकार देते. सगळेजण हट्ट करतात. तेव्हा ती घाबरून आजारी पडते. त्यावेळी तीला न कळत तिचे बाबा कुत्र्याचे पिल्लू आणतात. ते बघून ती खूश होते.
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
तुम्ही पाहिलेल्या प्राण्यांची नांवे सांगा?
मुलांचे दोन गट करून पाळीव प्राणी व जंगली प्राण्यांचे वर्गीकरण करून घेणे.
तुम्हाला आवडणारा प्राणी कोणता? आणि तो तुम्हाला का आवडतो?
ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया
अम्मूच्या मित्रांची नांवे सांगा?
कुत्र्याच्या पिल्लाचे नांव काय?
पिल्लूला काय खायला आवडते ?
पिल्लू कोणत्या रंगाचे आहे?
श्रवणोत्तर क्रिया
या गोष्टीतील तुम्हाला आवडलेले पात्र कोणते?
या गोष्टीतून आपल्याला कोणता बोध मिळतो ?
ही गोष्ट तुम्ही अभिनय रूपात सादर करा.