मराठी डबा पार्टी
Jump to navigation
Jump to search
परिचय
पूर्वी विद्यार्थी आपल्या घरूनच जेवणाचे डबे आणायचे आणि एकमेकांना आणलेली पंचपक्वान्ने वाटून धमालमस्ती करून खायचे.
अशीच धमाल मस्ती तुम्हाला डब्बा पार्टी या गोष्टीतून ऐकायला मिळणार आहे.
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- बडबडगीत
भक्तीनी आणली कांदा भाकर
मितालीने आणले दही साखर
चटणी लोणचे सुहानीचे
भात पिठले प्रतिक्षाचे
केळी आंबे शुभ्राचे
श्रीखंड पुरी मनिषाची
झाडाखाली पंगत बसली
अंगत पंगत छानचं जमली
- विद्यार्थ्याच्या संख्येनुसार त्यांचे गट करणे. त्यातील एका गटाला फळांची नावे, दुसऱ्या गटाला भाज्यांची नावे तसेच तिसऱ्या गटाला पदार्थांची नावे लिहिण्यास सांगून ती गटातून वाचून घेणे.
ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रीया
- मीनूच्या मित्रमैत्रिणीची नावे सांगा.
- मीनूच्या डब्यात कोणता पदार्थ होता?
- कमल आणि मीनूला डब्यातील पदार्थ आवडले काय?
श्रवणोत्तर क्रिया
- आड बाई आडोनी आडाचं पाणी काढोनी आडात होती सुपारी आमचा हादगा दुपारी सर्प म्हणे मी एकुला .. दारी आंबा पिकूला.... दारी आंब्याची कोय ग .. खिरापतीला काय ग..
- ए आई मला शाळेत जाऊ दे भावयुक्त प्रार्थना म्हणू दे दूध कसे बघ भरभर पिती जणू सर्वांशी स्पर्धा घडती क्षीरभाग्य योजनाचा लाभ घेऊ दे!! अ आ इ ई भरभर बोलती आकडेवारी पटपट ओळखती FLN ची प्रगती साधू दे!! राज्यभाषा पटकन शिकती हाय हॅलो चटकन म्हणती परिसरात सोबत मैत्री करू दे!! पोटामध्ये कावळी बोलती अक्षर दासोह भूक भागविती अंडी .... चिक्की.... केळी .... हवे ते खाऊ दे !! मित्रासवे खेळ खेळती गाणी गोष्टी रंगात येती शिकूनी मला खूप खूप मोठं होऊ दे
पाठ्यपुस्तकाशी सलग्नता
परिसर अध्ययन - आहार इयत्ता - पाचवी
आपल्या आहारातील सवयी