मराठी शहाणी सोना

From Karnataka Open Educational Resources
Jump to navigation Jump to search

परिचय

गोष्टीचे नाव आहे शहाणी सोना .सोना ही आपल्या वडिलांना गाडी तयार करत असताना वडील ज्याप्रमाणे काम करत असतात ते तिला करायची उत्सुकता लागते आणि त्यामध्ये ती मदत करून काम पटकन होण्यासाठी वडिलांना मदत करते.

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • विद्यार्थ्यांना ते घरी कोण कोणत्या कामांमध्ये, आई-वडिलांना मदत करतात असे प्रश्न विचारणे.
  • विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची कामे कोण कोणती आहेत ते विचारून घेणे.

ऐकण्याच्या दरम्यान क्रिया

  • विद्यार्थ्यांना शहाणी शोना ही गोष्ट समजावून सांगणे. सोना आपल्या वडिलांना कोणकोणत्या कामांमध्ये मदत करते .आणि  वडील करत असलेल्या कामाप्रमाणेच तीला कोणती कोणती कामे करता येतात.   जसे की खीळा ठोकणे ,वडिलांना दोरा आणि पेन्सिल शोधून देणे.
  • विद्यार्थ्यांना तराजू बनायचे साहित्य देऊन  आपण मार्गदर्शन करून तराजू बनवून घेणे ही कृती या ठिकाणी घेता येते. या कृतीद्वारे विद्यार्थी कात्रीने कापणे, गाठ मारणे ही कामे शिकू शकतात.

श्रवणोत्तर क्रिया

  • विद्यार्थ्यांना उद्योगधंदे तसेच त्यासाठी लागणारे साहित्य यांच्या जोड्या लावणे हि कृती घेऊन त्यांना कृतिशील बनवू शकतो.
  • शेतकऱ्याला शेतात काम करत असताना कोण कोणती अवजारे तो वापरतो याची माहिती देणे.

पाठ्यपुस्तकाशी जोडणे

इयत्ता पाचवीचा परिसर मधील समाज पाठाला या गोष्टीची जोड देता येईल.

अतिरिक्त संसाधने