मराठी लालची उंदीरमामा

From Karnataka Open Educational Resources
Revision as of 15:25, 4 December 2024 by Arjun (talk | contribs)
(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to navigation Jump to search

परिचय

उंदीर व पाव यावर आधारित ही गोष्ट आहे. उंदीर पाव घरी नेण्यासाठी खूप प्रयत्न करतो ? पण पाव जागचा हलत नाही. त्यावेळी उंदीर पाव थोडा थोडा खातो. व तो पाव घरात घेवून जातो. पण पोट खूप भरल्यामुळे त्याला घरात जाता येत नाही. त्याच्या लोभाची त्याला शिक्षा मिळते.

शिकण्याची उद्दिष्टे

वर्गातील उपक्रम

पूर्व-श्रवण उपक्रम

  • बडबड गीत अभिनय करून म्हणून घेणे "उंदीरमामा उंदीरमामा काय करता ? "
  • आपण न पाळता सुद्धा आपल्या घरी असणारे प्राणी कोणते ?
  • तुझ्या घरी पाळलेले कोणते प्राणी आहेत ?

ऐकण्याच्या दरम्यान क्रियाकलाप

  • उंदराला काय सापडले ? उंदीराने पाव कोठे नेण्याचा प्रयत्न केला?
  • पाव जागेवरून का हलला नाही ?
  • उंदराने पाव घरी नेण्यासाठी कोणते प्रयत्न केले ?

श्रवणोत्तर क्रियाकलाप

  • या गोष्टीवरून तुम्हांला कोणता बोध मिळतो ?
  • तुला आवडणाऱ्या प्राण्याची तुझ्या शब्दात माहिती सांग.
  • उंदराबद्दल तुम्हांला माहित असणारी तुरवादी गोष्ट किंवा बडबडगीत म्हणा.

पाठ्यपुस्तकाशी जोडणे

"जावयाची करामत " या  पाठाशी ही गोष्ट संबंधित आहे.

अतिरिक्त संसाधने