मराठी डरॉव डरॉव
परिचय
पावसाळ्या ऋतूमध्ये दिसणाऱ्या विविध प्राण्यांची ओळख व्हावी, त्यांच्याविषयीची भीती कमी व्हावी, निसर्गातील प्रत्येक गोष्टीकडे आपण सकारात्मकतेने पाहिले तर ती गोष्ट आपला मित्र बनू शकते. प्रस्तुत गोष्टीमध्येही बेडूक शाळेमध्ये येतो व शाळेमधील कृतीमध्ये सहभागी होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कसे मनोरंजन होते हे सांगितले आहे.
शिकण्याची उद्दिष्टे
वर्गातील उपक्रम
पूर्व-श्रवण उपक्रम
- वर्गामध्ये गोष्टीला अनुरूप वातावरण तयार करण्यासाठी पुढील गीत आपण घेऊ शकतो. उदा. बेडूक मामा डराॅव डराॅव चकली खातो कराॅव कराॅव बेडूक मामाचे मोठे मोठे डोळे काळे काळे काजळाचे गोळे , बेडूक मामाला वाजली थंडी , आईला म्हणतो, "दे मला बंडी" आई म्हणाली थांब थांब कोट शिवते लांब लांब आईने शिवला शानदार कोट बेडूक मामाचे उघडे पोट बेडूक मामाची गंमत झाली टुणकन पाण्यात उडी मारली
- पावसाळ्यात दिसणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा?
- पावसाळ्यातील सुरुवातीला येणाऱ्या बदलांविषयी चर्चा करा उदा. मातीचा वास,चिखल, पाणथळ जागा
ऐकण्याच्या दरम्यानच्या क्रिया
1. उडी मारून आत कोण आलं?
2. गोष्टीतील घटना कुठे घडत आहे?
3. गोष्टीतील बेडूक कसा आहे?
4. इंग्रजीच्या तासाला बेडूक कुठे बसला होता?
- एखादा प्राणी आकस्मिक रित्या तुमच्या वर्गात आला तर तुम्ही काय कराल? यावर चर्चा करणे.
श्रवणोत्तर क्रिया
- गोष्ट पूर्ण ऐकवल्यानंतर पुढील कृतीद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करू शकतो.
- पावसाळ्यात दिसणाऱ्या विविध प्राण्यांच्या आवाजाची नक्कल करा.
- पावसाळा ऋतुचे चित्र काढा.
- निरूपद्रवी व उपद्रवी प्राण्यांची यादी करा.
पाठ्यपुस्तकाशी सलग्नता
ही कथा ज्या घटकाशी संबंधित होईल त्या घटकाशी संबंधित वापर करावा.